साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार 2020 - लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना जाहीर
देशातील साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार 25 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर.
मराठी आणि बंगाली भाषेसाठी या पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
मराठीतून देवबाभळी या नाटकाने बाजी मारली.
नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना पुरस्कार जाहीर.
ते मूळ नाशिक जिल्ह्यातील आहेत.
संगीत देवबाभळीचे कथानक - संत तुकाराम यांची पत्नी आवली हिच्या पायात काटा मोडतो. स्वतः विठ्ठल प्रकट होऊन आवलीच्या पायातील काटा काढतात. आवलीची काळजी घेण्यासाठी साक्षात रुखुमाईला पाठवतात.
या दोन्ही स्त्रिया एकत्र आल्यावर तुकारामांचा, विठ्ठलाचा, भक्तिपरंपरेचा, आस्तिक्याचा वेध घेतात
बंगालीभाषेतून पुराणपुरुष या कादंबरीसाठी साठी लेखक श्याम बंडोपाध्याय यांना जाहीर.
दरवर्षी 35 वर्षाच्या आतील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप - 50 हजार रुपये रोख, ताम्रपत्र
मराठीच्या पुरस्कारासाठी त्रिसदस्यीय ज्युरी -
1.श्रीम.आशा बगे (2006 - भूमी कादंबरी साठी साहित्य अकादमी पुरस्कार)
2.श्री.दिलीप प्रभावळकर (ज्येष्ठ अभिनेते, बोक्या सातबंडे या पुस्तक मालिकेसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार)
3.श्री.लक्ष्मीकांत देशमुख (९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदाचे अध्यक्ष)
No comments