आंतरराष्ट्रीय घडामोडी
स्ट्रॉबेरी उत्पादनात चीनची आघाडी
स्ट्रॉबेरी उत्पादन करणारे प्रमुख देश
चीन – ३३,९०,००० टन
अमेरिका – ११,२१,००० टन
तुर्किये – ६,६९,१९५ टन
फ्रान्स – ७५,७०० टन
युनावफॉर – युरोपियन युनियन फॉर नेव्हल फोर्स
युरोपीय नौदलासह भारतीय नौदलाने मुंबईजवळील अरबी समुद्रात चाचेगिरीविरोधी लढ्याचा सराव केला.
इटली व स्पेनच्या युद्धनौकांचा सहभाग
युद्ध सराव – १ ते ३ जून
हुती दहशतवादी व सोमालियन चाच्यांचा प्रश्न एडनच्या आखातात डोके वर काढत आहे.
विविध देशांच्या नौदलाकडून त्यांचा संयुक्त सामना केला जात आहे. यामध्ये भारतीय युद्ध नौकांचा देखील समावेश आहे.
युरोपियन नौदलांनी त्यासाठी युनावफॉर – युरोपियन युनियन फॉर नेव्हल फोर्स हे संयुक्त दल स्थापन केले आहे.
त्यांच्या चाचेगिरीविरोधी मोहिमेला ऑपरेशन अटलांटा असे नाव दिले आहे.
इटलीच्या नौदलाची अॅन्तिनीओ मार्सेग्लिया व स्पेनच्या नौदलाची रेइना सोफिया या युद्धनौकांचा सहभाग
अनिता आनंद
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपदाचा कारभार सोपवला आहे.
भगवद्गीतेवर हात ठेवून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
यापूर्वी संरक्षणमंत्री, वाहतूक आणि अंतर्गत व्यापार, सार्वजनिक सेवा आणि खरेदी या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पार पाडली.
राज्यशास्त्रात पदवी आणि कायद्याचे उच्च शिक्षण
२०१९ ची निवडणूक लढविण्यापूर्वी टोरांटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापिका
कॅनडाच्या मंत्रिमंडळातील त्या पहिल्या हिंदू महिला.
माउंट एव्हरेस्ट
चीनकडून चोमोलुंग्मा असा उल्लेख
नेपाळकडून सागरमाथा अशी प्रसिद्धी
व्हिएतनाम युद्ध समाप्तीचा सुवर्ण महोत्सव
व्हिएतनामची राजधानी हो चिमिन्स सिटी मध्ये ३० एप्रिल २०२५ रोजी साजरा करण्यात आला.
व्हिएतनामचे राष्ट्रीय चिन्ह – लॅक बर्ड हा काल्पनिक पक्षी
हो चि मिन्ह – १९२५ – कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनाम ची स्थापना
या काळात व्हिएतनाम – इंडो चायना म्हणून ओळखला जात होता.
No comments