आर्थिक घडामोडी
जून २०२५
पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ – अहवाल
जागतिक बँकेचा अहवाल
भारतातील गरिबी घटून २०२२-२३ मध्ये ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
देशातील गरिबीचा दर २०११-१२ मध्ये २७.१ टक्के होता.
अहवालानुसार भारतातील गरिबीचा दर घटल्याचे म्हटले आहे.
२०१७ ते २०२१ या काळात भारतातील महागाई दर पाहता दारिद्र्यरेषेची मर्यादा २०२१ मधील २.१५ डॉलर वरून १५ टक्क्यांनी वाढवून २०२४ मध्ये ३ डॉलर प्रतिदिन उत्पन्न इतकी करण्यात आली.
असे असूनही २०२२-२३ या काळात देशातील गरिबीचा दर ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आला.
जागतिक बँकेचा अहवाल
भारतातील ५ कोटी ४६ लाख ९५ हजार ८३२ लोक दर दिवशी तीन डॉलर पेक्षा कमी उत्पन्नात २०२४ मध्ये जगत होते.
सन २०२४ मध्ये गरिबीचा दर ५.४४ टक्के इतका नोंदवला गेला.
२०११-१२ ते २०२२-२३ – १७.१ कोटी लोक गरिबीतून बाहेर
अत्यंत गरिबीत घट
२०११-१२ – १६.२ टक्के
२०२२-२३ – २.३ टक्के
अत्यंत गरिबी
ग्रामीण भाग
२०११-१२ – १८.४ टक्के
२०२२-२३ – २.८ टक्के
शहरी भाग
२०११-१२ – १०.७ टक्के
२०२२-२३ – १.१ टक्के
५४ टक्के – सर्वाधिक लोकसंख्येच्या पाच राज्यांमध्ये एकूण गरीब
गरिबीत घट होण्याची कारणे -
मोफत आणि अंशदान असलेल्या अन्नधान्याचा पुरवठा, ग्रामीण शहरी गरिबीमधील फरक कमी झाल्यामुळे गरिबीत घट झाल्याचे अहवालात नमूद
अन्नधान्याचे उत्पादन ३५.४ कोटी टनांवर
देशातील अन्नधान्याचे उत्पादन २०२४-२५ या वर्षात ६.६ टक्क्यांनी वाढून ३५.४ टनांपर्यंत पोहोचले आहे.
ही गेल्या आठ वर्षातील सर्वाधिक जलद वाढ असून अन्न धान्य उत्पादनाने नवीन उच्चांक गाठला आहे.
तांदूळ, गहू, मका, भुईमुग आणि सोयाबीन यांसह सर्व प्रमुख पिकांचे विक्रमी उत्पादन नोंदवण्यात आले आहे.
केंद्रीय कृषी मंत्री – शिवराजसिंग चौहान
अंदाजे उत्पादन २०२४-२५
गहू – ११.७ कोटी टन – गेल्यावर्षी – ११.३ कोटी टन
तांदूळ – १४.९ कोटी टन – गेल्यावर्षी – १३.८ कोटी टन
मका – ४.२ कोटी टन
डाळी – २.५ कोटी टन – गेल्यावर्षी – २.४ कोटी टन
सोयाबीन – १.५१ कोटी टन
भुईमुग – १.१२ कोटी टन
एडीबी
आशियाई विकास बँक – स्थापना १९६६
अध्यक्ष – मसातो कांडा
अध्यक्षांची भारत भेट
विकसित भारत ४७ चे कौतुक
भारताला बाह्य गुंतवणूकदारांकडून उभारण्यात आलेल्या भांडवलासह पुढील पाच वर्षात १० अब्ज डॉलरची मदत करण्याचे आश्वासन
महापालिकांतील पायाभूत सुविधांचा विकास, मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, प्रादेशिक जलदगती वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी मदत, शहरांना आधुनिक रूप देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन
विमानप्रवासात भारत तिसरा
१७.५ कोटी – २०२४ मध्ये भारतातील व्यक्तींनी केलेला विमानप्रवास
२०२४ मध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हवाई प्रवासी वाहतूक करणारा देश ठरला आहे.
ही आकडेवारी जागतिक आकडेवारीच्या ४.२ टक्के आहे.
पहिल्या क्रमांकावर अमेरिका – १८.१ टक्के
दुसऱ्या क्रमांकावर चीन – १६.७ टक्के
अपेक्षित वाढ
२०४४ पर्यंत ५.६ टक्के
दर एक हजार लोकांमागील उड्डाणे – २०२४ – १४८
२०४४ – २५८
२०११- २०१९ दरम्यानची वाढ – विमानप्रवासात १०.३ टक्क्यांचा वार्षिक वृद्धी दर
हवाई मार्ग २०१५ – २०२४ – हवाई मार्गांची संख्या ९९० वरून १९३० झाली अर्थात ९४ टक्क्यांची वाढ
प्रमुख आंतरराष्ट्रीय हवाईमार्ग
दिल्ली/मुंबई – दुबई (एकत्रित) आंतरराष्ट्रीय वाहतुकीतील ४.९ टक्के
देशांतर्गत प्रमुख हवाईमार्ग -
मुंबई – दिल्ली – ३.४ टक्के – ३९००० टक्के
बेंगळूरू – दिल्ली – २.४ टक्के – २७००० टक्के
बेंगळूरू – मुंबई – २.२ टक्के – २५००० उड्डाणे
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग
शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन – ५ जून २०२५
पिंपरी सद्रोद्दिन (इगतपुरी) येथे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते
एकूण लांबी – ७०१ किमी
समृद्धी हा देशातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती मार्ग आहे.
ताशी कमाल १२० किमी वेगाने विना अडथळा वाहन चालवून वेळ व इंधनाची बचत करणारा ७०१ किमीचा महामार्ग चार टप्प्यांत सुरु झाला.
पिंपरी सद्रोद्दिन येथे राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा सुरु होत आहे.
७.७६ किमी लांबीचा बोगदा – इगतपुरी ते कसारा दरम्यान थळ घाटात
समृद्धी महामार्गाचा प्रवास
पहिला टप्पा – शिवमडका (नागपूर) ते कोकमठाण (शिर्डी) – ५२० किमी – डिसेंबर २०२२
दुसरा टप्पा – चांदेकसारे (शिर्डी) ते भरवीर खुर्द (सिन्नर) – ८० किमी – मे २०२३
तिसरा टप्पा – भरवीर खुर्द ते पिंपरी सद्रोद्दिन (इगतपुरी) – २५ किमी – मार्च २०२४
चौथा टप्पा – पिंपरी सद्रोद्दिन ते आमने (भिवंडी) – ७६ किमी – जून २०२५
समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो ?
१० जिल्हे – नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे
१० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जातो.
शिवमडका (नागपूर) ते आमने (भिवंडी) – या दोन ठिकाणांना जोडणारा महामार्ग
जीएसटी वसुलीत १६.४ टक्के वाढ
मे २०२५ – २.०१ लाख कोटी वसुली
मे २०२४ – १.७२ लाख कोटी वसुली
मे २०२४ च्या तुलनेत १६.४ टक्के वाढ
सर्वाधिक वसुली – एप्रिल २०२५ मध्ये – २.३७ लाख कोटी
वार्षिक तत्त्वावर आयात मालावरील करवसुलीत झालेली वाढ – २५.२ टक्के
५१ हजार २६६ कोटी रुपये सरकारला महसुलातून जमा
देशांतर्गत व्यवहारावरील करवसुलीत झालेली वाढ – १३.७ टक्के
१ लाख ४९ हजार ७८५ कोटी रुपये सरकारला महसुलातून प्राप्त
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू यासारख्या मोठ्या राज्यांतील करवसुलीचा वृद्धीदर – १७ ते २५ टक्क्यांच्या दरम्यान
मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब व राजस्थान – या राज्यांतील करवसुलीचा वृद्धीदर १० टक्क्यांच्या आसपास
पारंपारिक खादी आधुनिक टी शर्टच्या रुपात
वर्ध्याच्या मगन संग्रहालयाची निर्मिती – देशातील पहिलाच प्रयोग
देशी कापसापासून निर्मित कापडाला नैसर्गिक रंगाची रंगत आणली.
देशी कापसाच्या धाग्याचे तंत्रज्ञान विकसित करून वेगळेपण जपत खादीतून टी शर्ट निर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे खादीचे रूप बदलले आहे.
देशातील हा पहिलावहिला प्रयोग ठरला आहे.
टी शर्ट निर्मितीत तामिळनाडू राज्यातील तिरपूर देशात प्रसिद्ध आहे.
लाइक्रा, पॉलिस्टर, नायलॉन, कॉटन – या धाग्यांचाच टी शर्ट निर्मितीत वापर केला जातो.
No comments