Future IAS सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
सन्माननीय शिक्षक, पालक व विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच MPSC चा पेपर झाला, त्यामध्ये इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील प्रश्न श्री. गुरुदेव सेवा मंडळ कोणी स्थापन केले ? UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC PSI पूर्व परीक्षेत इयत्ता चौथीच्या पुस्तकातील प्रश्न उलगुलान म्हणजे काय ? असे अनेक प्रश्न वारंवार पाठ्यपुस्तकांवर आधारित येत असतात. यासाठी प्राथमिक स्तरापासूनच या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.
UPSC सारख्या परीक्षांचा निकाल जाहीर होतो, तेव्हा उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील काही राज्ये बिहार, कर्नाटक यासारख्या राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असते. परंतु आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी या परीक्षेत मागे पडल्याचे किंवा अत्यल्प उत्तीर्ण होऊन अधिकारी झाल्याचे ऐकायला, पाहायला मिळते.
अधिकारी होऊन आघाडीवर असणाऱ्या या राज्यातील विद्यार्थ्यांचे यशाचे गुपित शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दडलेले आहे. यासाठी पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित तसेच देश आणि आपल्या राज्यातील महत्त्वपूर्ण बाबींवर आधारित सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा हा उपक्रम The Spardha Guru या वेबसाईटच्या माध्यमातून सुरु करण्यात येत आहे.
यामध्ये 10 प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नमंजुषा वेबसाईटवर नियमित प्रसिद्ध करण्यात येईल. ही प्रश्नमंजुषा पूर्णपणे नि:शुल्क असून विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाची तयारी करून घेण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात येत आहे. तसेच शिक्षक बंधू भगिनींना शालेय परिपाठात ही या प्रश्नमंजुषेचा उपयोग करता येईल.
भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सरांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, "Low aim is a crime." त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ध्येय हे मोठे असायला हवे आणि ते साध्य करण्यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्कीच पहिले पाऊल ठरेल.
सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!
No comments