संरक्षण घडामोडी
जून २०२५
युनावफॉर – युरोपियन युनियन फॉर नेव्हल फोर्स
युरोपीय नौदलासह भारतीय नौदलाने मुंबईजवळील अरबी समुद्रात चाचेगिरीविरोधी लढ्याचा सराव केला.
इटली व स्पेनच्या युद्धनौकांचा सहभाग
युद्ध सराव – १ ते ३ जून
हुती दहशतवादी व सोमालियन चाच्यांचा प्रश्न एडनच्या आखातात डोके वर काढत आहे.
विविध देशांच्या नौदलाकडून त्यांचा संयुक्त सामना केला जात आहे. यामध्ये भारतीय युद्ध नौकांचा देखील समावेश आहे.
युरोपियन नौदलांनी त्यासाठी युनावफॉर – युरोपियन युनियन फॉर नेव्हल फोर्स हे संयुक्त दल स्थापन केले आहे.
त्यांच्या चाचेगिरीविरोधी मोहिमेला ऑपरेशन अटलांटा असे नाव दिले आहे.
इटलीच्या नौदलाची अॅन्तिनीओ मार्सेग्लिया व स्पेनच्या नौदलाची रेइना सोफिया या युद्धनौकांचा सहभाग
सायबर हल्ला
सायबर युद्ध म्हणजे काय ?
एखाद्या देशावर सायबर हल्ला करणे म्हणजे डिजिटल युद्ध होय.
हॅकर्सनी कम्प्युटर, नेटवर्क किंवा मालवेअर वापरून देशाच्या महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये व्यत्यय आणण्याचा, नुकसान करण्याचा किंवा डेटा चोरण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजेच सायबर युद्ध.
यामध्ये साधारणतः सरकारी वेबसाईट, लष्करी यंत्रणा, पॉवर ग्रीड्स, विमानतळ, बँका, वृत्तवाहिन्या, खासगी कंपन्यांचे नेटवर्क यांवर हल्ला करण्यात येतो.
हल्ल्याचे प्रकार
डीडॉस हल्ला – वेबसाईट / सर्व्हर ओव्हरलोड / ओव्हर ट्रॅफिक केले जातात. त्यामुळे ते क्रॅश होतात. सरकारी वेबसाईट ऑफलाईन होतात.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर करण्यात आलेले हल्ले हे डीडॉस प्रकारचे होते.
यामध्ये अनेक कम्प्युटर्स मार्फत (बॉटनेटचा भाग) एकत्रितपणे लक्ष्यावर हल्ला केला जातो.
हा प्रकार अधिक शक्तिशाली आणि सर्रास वापरला जातो.
हे हल्ले पाकिस्तान सोबत कोरिया, व्हिएतनाम, तुर्की या देशांतून करण्यात येत होते.
तासाला ५० ते ६० हल्ले एवढी त्यांची वारंवारता होती.
देशातील जवळपास १० लाख साईट वर हल्ले करण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबर ने म्हटले होते.
डेटा चोरी – गुप्त किंवा वैयक्तिक डेटा चोरला जातो. लष्करी योजना किंवा नागरिकांचे रेकॉर्ड चोरले जातात.
मालवेअर / रॅन्समवेअर – यंत्रणांना संक्रमित केले जाते. डेटा लॉक केला जातो. खंडणी मागितली जाते. पॉवर ग्रीड किंवा रुग्णालये प्रभावित होतात.
खोट्या बातम्या / माहिती – निवडणुका किंवा युद्धादरम्यान दहशत किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी खोटी माहिती पसरवली जाते. पायाभूत सुविधांची हॅकिंग, वीज, पाणी किंवा वाहतूक व्यवसायांना लक्ष्य केले जाते.
सोनगर ड्रोन – तुर्की बनावटीचे ड्रोन
असिसगार्ड सोनगर हे तुर्कीने स्वतः विकसित केलेले सशस्त्र ड्रोन आहे.
हवेतून जमिनीवर मारा करणे आणि टेहळणी करणे – शक्ती
तुर्कीची राजधानी अंकारा येथील असिसगार्ड या कंपनीने बनवली आहेत.
२०२० पासून तुर्कीच्या लष्करात हे ड्रोन समाविष्ट
कार्यक्षमता
स्वयंचलित आणि मानव नियंत्रित अशा दोन्ही पद्धतीने उडवता येते.
लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निश्चित करता येतो. त्याचबरोबर उड्डाणादरम्यान मार्ग बदलणेही शक्य
संपर्क तुटल्यास किंवा बॅटरी लो झाल्यास परत येण्याची सुविधा उपलब्ध
दिवस आणि रात्रीही काम करू शकतील, असे कॅमेरे यावर बसविलेले असतात. त्यातील एक पायलट कॅमेरा आणि एक बंदुकीवर बसवलेला असतो.त्यातील एक पायलट कॅमेरा आणि एक बंदुकीवर बसवलेला असतो.
पायदळाच्या त्वरित हालचालींसाठी उपयुक्त ठरेल, अशा रीतीने विकसन. कोणत्याही लष्करी वाहनावरूनही सोडता येते.
सोनगर वरील शस्त्रप्रणाली
५.५६ x ४५ मिलीमीटर नाटो असॉल्ट रायफल – एका वेळी २०० गोळ्या मारणे किंवा बर्स्ट मोडमध्ये १५ राउंड फायर करणे शक्य
तोफगोळे प्रक्षेपक – ४ किंवा ६ बॅरल प्रकारात उपलब्ध. त्यांचा पल्ला ४०० ते ४५० मीटर असतो.
८१ मिलीमीटरची उखळी तोफ – तुबिताक सेज कंपनीच्या सहयोगाने हवेतून मारा करण्याचा दारुगोळा विकसित
छोटी क्षेपणास्त्रे – लेझर गायडेड क्षेपणास्त्रे डागता येतात.
छोटी रायफल – ७.६२ x ३९ मिमी व्यासाच्या तुर्की बनावटीच्या एसएआर १५ टी रायफलची चाचणी झाली असून मारक पल्ला ४०० मीटर आहे.
सोनगर ची तांत्रिक माहिती
प्रकार – क्वाडरोटर वैमानिकविरहित लढाऊ हवाई वाहन
उड्डाणावेळचे कमाल वजन – ४५ किलो
लांबी – १४० ते १४५ सेंमी
उड्डाणक्षमता – २५ मिनिटांपर्यंत
कमाल भारवहन क्षमता – ९ किलो
वातावरणीय मर्यादा – उणे २० अंश ते कमाल ५० अंश तापमानात काम करू शकते. वाऱ्याचा प्रतिरोध प्रतिसेकंदास १० मीटर सहन करू शकते.
कमाल उड्डाण क्षमता – समुद्रापासून ३००० मी. उंच, जमिनीपासून ३०० मी.
पल्ला – सर्वसाधारण ३ किमी (वाढीव ५ किमी)
दिशादर्शन प्रणाली – जीपीएस आणि ग्लोनास वापरण्याक्षम
आकाश - स्वदेशी बनावटीची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली
वजन – ७२० किलो
व्यास – ३५ सेंटीमीटर
लांबी – ५.७८ मीटर
भेदन क्षमता – २५ किमी
उद्दिष्ट – शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्रे यांचा मागोवा घेणे आणि त्यांचा नाश करणे. ही क्षेपणास्त्र प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित आहे.
आकाश – वैशिष्ट्ये
सर्व ऋतुंमध्ये कार्यक्षम
९६ टक्के स्वदेशी बनावटीचे
एकाच वेळी अनेक दिशांनी येणाऱ्या हवाई धोक्यांना सामोरे जाण्याची क्षमता
आकाश क्षेपणास्त्राबद्दल माहिती -
जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र १९८३ मध्ये भारतात सुरु झालेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील पाच प्रमुख क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एक आहे.
तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या विलंबानंतर आकाश भारतीय हवाई दल आणि भारतीय सैन्यात दाखल केले गेले होते.
२०१४ मध्ये हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलात,
तर २०१५ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले.
आकाश क्षेपणास्त्राच्या प्रगत आवृत्त्या – आकाश – १ एस, आकाश प्राईम, आकाश – एनजी
भारताने आकाश क्षेपणास्त्र प्रणाली संयुक्त अरब अमिरातीसह इतर राष्ट्रांना निर्यात करण्यासाठी देखील उपपब्ध केली आहे.
ट्रकसारख्या वाहनांवर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज वाहून नेण्यासारखे आहे.
ब्राम्होस
भारत व रशिया यांनी संयुक्तरीत्या विकसित
केलेले क्षेपणास्त्र
ध्वनीपेक्षा तीनपट जास्त वेगाने जगातील सर्वात
वेगवान असे हे क्रुझ क्षेपणास्त्र
दोनशे ते तीनशे किलो वजनाची अस्रे वाहून नेण्याची
क्षमता
जमिनीवरील किंवा समुद्रातील लक्ष्यांचा भेद करू
शकते.
युद्ध जाहीर कसे होते ?
भारतातील प्रक्रिया
युद्ध किंवा बाह्य आक्रमणासारख्या प्रसंगात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ३५२ हे विशेष कलम लागू करण्यात येते.
राज्यघटनेनुसार, युद्ध जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती युद्ध जाहीर करतात.
युद्ध जाहीर करण्याचा अधिकार संसदेला नसला, तरीही या काळामध्ये सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहांना परिस्थितीची माहिती देणे आणि राजकीय एकमत तयार करणे अपेक्षित असते.
कलम ३५२ नुसार, आणीबाणी लागू करण्यासाठीही संसदेची मंजुरी आवश्यक असते.
रशियातील प्रक्रिया -
रशियामध्ये अध्यक्षाला युद्ध जाहीर करण्याचा अधिकार आहे.
मात्र युक्रेन युद्धावेळी व्लीदिमीर पुतीन यांनी विशेष लष्करी कारवाई असे म्हटले होते, मात्र युद्ध हा शब्द वापरण्याचे टाळले होते.
ब्रिटनमधील प्रक्रिया
ब्रिटनमध्ये राजाच्या वतीने पंतप्रधान युद्धाची घोषणा करतात.
अमेरिकेमधील प्रक्रिया -
अमेरिकेमध्ये युद्ध जाहीर करण्याचा अधिकार अमेरिकी कॉंग्रेसला आहे.
युद्धाची घोषणा होत नसते
१९४८ मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी टोळीवाल्यांच्या वेशामध्ये काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यानंतर भारतीय लष्कराने हस्तक्षेप केला. यावेळी दोन्ही बाजूंकडून युद्धाची औपचारिक घोषणा झाली नव्हती.
१९६२ मध्ये चीनने ईशान्य भारतामध्ये अचानक आक्रमण केले. एक महिना हे युद्ध चालले, मात्र भारत किंवा चीन यांच्याकडून युद्धाची घोषणा झाली नाही. एक महिन्यानंतर चीनने एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आणि माघार घेतली.
१९६५ मध्ये सीमांवरील चकमकीनंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि संघर्षाला सुरुवात झाली. यावेळीही प्रत्यक्ष युद्धाची घोषणा झाली नव्हती.
१९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानात पाक लष्कराने बांगला नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. भारताने लष्करी कारवाई केली, मात्र युद्धाची घोषणा झालीच नाही.
१९९९ मध्ये कारगिलमध्ये झालेला संघर्ष हा पूर्णपणे भरतीय भूभागात होता. त्यामुळे हा मर्यादित स्वरूपाचा संघर्ष होता, त्यामुळे युद्ध जाहीर करण्याचा प्रश्नच नव्हता.
ऑपरेशन सिंदूर
तुर्की विद्यापीठांबरोबरचे करार मोडले
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, कानपूर विद्यापीठ आणि हैदराबाद मधील मौलाना आझाद उर्दू विद्यापीठ यांनी तुर्की विद्यापीठांबरोबरचे करार रद्द केले आहेत.
भारतीय हवाई दलाची एकात्मिक हवाई आज्ञा आणि नियंत्रण प्रणालीचा (इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम)
शत्रूची विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रे, रडार यंत्रणा, नियंत्रण केंद्रे, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली इ.गोष्टींपासून संरक्षण करण्याचे काम टेहळणी कवच करते.
सार्वजनिक क्षेत्रातील हवाई क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनासाठी कार्यरत असणाऱ्या भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड द्वारा विकसित करण्यात आलेली एकात्मिक हवाई आज्ञा प्रणाली ही एक स्वयंचलित प्रणाली आहे.
अशा यंत्रणेची गरज १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान निर्माण झाली.
२००३ मध्ये इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम साठी स्वतंत्र विभागाची स्थापना झाली.
उद्देश – शत्रूराष्ट्राच्या कोणत्याही हल्ल्याला परतविण्याची जबाबदारी
आयएसीसीएस ची केंद्रे – एअरफोर्स नेटवर्क च्या अंतर्गत भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड च्या पंजाबमधील बर्नाला, गुजरातमधील वडसर, दिल्लीतील अयानगर, राजस्थानमधील जोधपुर आणि हरियाणामधील अंबाला
या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात चार नावे मुख्य टप्पे आणि १० सबस्टेशन स्थापन करण्यात येणार आहेत. त्यापैकी तीन टप्पे पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतात तैनात केले जातील, तर चौथा अंदमान आणि निकोबार बेट समूहासाठी असणार आहे. याद्वारा मलाक्का सामुद्रधुनीवर लक्ष ठेवले जाईल.
आयएसीसीएस – आकाशतीर यंत्रणा
१.टेहळणी रडार २.मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र ३.ड्रोन आणि मॅनपॅडस ४.लांब पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र ५.छोट्या पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र
पहिला स्तर – प्रतिबंधात्मक ड्रोन
दुसरा स्तर – हवाई संरक्षण टप्पा आणि लहान पल्ल्याचे क्षेपणास्त्र
तिसरा स्तर – मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र
चौथा स्तर – लांब पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र
No comments