Header Ads

व्यक्ती विशेष घडामोडी

 

जून २०२५

समाज परिवर्तनाच्या चळवळींचे अध्वर्यू, कामगार चळवळीचे आधारस्तंभ व उपेक्षित कष्टकरी वर्गाचे आधारवड

डॉ.बाबा आढाव 

जन्म दिवस १ जून, ९५ वर्षे पूर्ण

प्रेरणास्त्रोत महात्मा जोतीराव फुले

महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान ची स्थापना

हमाल पंचायत ची स्थापना सर्वात महत्त्वाचे कार्य

हमालांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापना

या माध्यमातून कष्टाची भाकर ना नफा ना तोटा या तत्त्वावर अनेक वर्षांपासून उपक्रम सुरु

हमाल भवन गुलटेकडी

समाजवादी विचार जोपासला.

समाजवाद हा समता तत्त्वावर आधारलेला असतो. राजकारणापासून दूर

मार्गदर्शक एस.एम.जोशी

विषमता निर्मुलन समितीचे कार्य जोशींच्या मार्गदर्शनाखाली सुरु केले.

एक गाव एक पाणवठा स्पृश्य आणि अस्पृश्य समाजांना एकत्रित आणण्यासाठीचा प्रयत्न आणि प्रयोग

जोगतीणीच्या पुनर्वसनाचे काम देवदासींची प्रथा संपवण्यासाठी लढा दिला.

पुरोगामी सत्यशोधक पत्रिका ४५ वर्षांपासून नियमित प्रकाशन

भाषणाची सुरुवात महात्मा फुले यांच्या सत्य सर्वांचे आदी घर | सर्व धर्माचे माहेर या अखंडाने करतात.

माथाडी कामगारांसाठी कार्य

माथाडी कामगार डोक्यावरून वस्तूंची ने आण करावी लागत असल्याने माथाडी कामगार हा शब्द प्रचलित

मुंबईतील दिवंगत कामगार नेते डिमेलो यांनी गोदी कामगारांची संघटना स्थापन केली होती.

डिमेलो यांनी माथाडी हा शब्द हमालांसाठी प्रचलित केला.


मे २०२५ 

प्रख्यात गायिका, पद्मश्री पंडिता माणिक वर्मा यांची

जन्मशताब्दी १६ मे पासून सुरु

माणिकबाईंचे गुरु - पं.सुरेशबानू माने हे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक, पं.इनायतखानसाहेब, सुधीर फडके, भोलानाथ भट अलाहाबाद, पं.जगन्नाथ बुवा पुरोहित आग्रा घराण्याचे गायक   

गाणी बहरली जणू लतिका कालिका, चल जाऊ या रमू या वनी, सावळाच रंग तुझा, पैंजण पायी माझ्या रुणझुण बोले, कबीराचे विणतो शेले, श्रीहरी विदुराघरी पाहुणा, जाळीमंदी पिकली करवंद, घननिळा लडिवाळा, क्षणभर उघड नयन देवा, माळ पदक विठ्ठल, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, कृष्णा पुरेना थट्टा किती ही, वाजवी मुरली शामसुंदरा 

तुझ्या मनात कोणीतरी लपल ग, हसले मनी चांदणे, जाळीमंदी पिकली करवंद, मै तो सावरेकी रंगराची

चित्रपट गोकुळ, आगे बढो, सीधा रस्ता, अपराधी


सयाजीराव सिलम

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष

जयंती १८ मे (१८ मे १८९६ कामाठीपुरा, मुंबई)

मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील करखेली त्याकाळात निजामाच्या प्रांतात

मूळ तेलगुभाषक

कापडाच्या व्यापारानिमित्त मुंबईत स्थलांतर

व्यापाराचा मार्ग न निवडता राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाले.

१९०८ तेलगु बालक ज्ञानोत्तेजक सभेची स्थापना

लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव

महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात काम

कायद्याची पदवी

तेलगू मित्र मासिक तेलगु भाषक समाजात जागृती करण्यासाठी

१९२२ मुंबई महापालिकेत प्रवेश १९४६ पर्यंत सदस्य

या काळात स्टँडिंग कमिटी, वर्क्स कमिटी, मार्केट्स & गार्डन्स कमिटीचे अध्यक्ष, बॉम्बे इम्प्रुवमेंट ट्रस्ट कमिटी आणि स्कूल कमिटी चे काम पाहिले.

       पूर्वी मुंबई महापालिकेच्या शाळा या बहुतांश भाड्याच्या खोल्यांमध्ये असत. सिलम यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या शाळांना स्वतंत्र इमारती मिळाल्या.

मार्केट्स कमिटीवर असताना क्रॉफर्ड मार्केट (आताची महात्मा फुले मंडई), भायखळा मार्केट मधील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवल्या.

महापालिकेतील महत्त्वाचे काम गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळक यांचा पुतळा उभारला

१९४६ मुंबई प्रांताच्या विधानसभेवर निवड

          विधानसभेवर निवड झाल्यावर कॉंग्रेस पक्षाने विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून काम करण्याची संधी दिली.

१९५२ टँकपाखाडी भायखळा पश्चिम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले.

१९५६ तत्कालीन अध्यक्ष नानासाहेब कुंटे यांनी राजीनामा दिल्यानंतर सिलम यांची मुंबई राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड

कसोटीच्या काळात अध्यक्षपदाची संधी संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्या काळात ऐन भरात होती. आचार्य अत्रे, एस.एम.जोशी यासारखे नेते विरोधी बाकावर होते.

         द्विभाषिक मुंबई विधानसभेच्या १९५७ मधील निवडणुकीत वाळकेश्वर (आताचा मलबार हिल) मतदारसंघातून पुन्हा विधानसभेवर निवड

दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सिलम यांना विधानसभेचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला.

त्या काळात विधानसभेचे स्वतंत्र सचिवालय नव्हते, सिलम यांच्या काळात ते सुरु करण्यात आले.

कुंटे यांच्या काळात सुरु झालेले विधानसभेच्या ग्रंथालयाचे काम सिलम यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेले.

आमदार निवासाची वास्तू पूर्ण झाली.

महाराष्ट्राचा राज्यकारभार मराठीतून चालावा, यासाठी आग्रही

संसदीय भाषेचा मराठी शब्दकोश तयार करण्यासाठी प्रयत्न केले.

यातूनच पदनाम कोश, प्रशासन वाक्प्रयोग हे दोन ग्रंथ निर्माण झाले.

पदुच्चेरीचे पहिले नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती

निधन ५ जुलै १९८०

सामाजिक  - संस्थात्मक कार्य

मुंबई ऑटोमोबाईल एम्प्लॉइज युनियन आणि मुंबई इन्शुरन्स एम्प्लॉइज युनियन या संस्थांचे अध्यक्ष 

सर्वात महत्त्वाचे सामाजिक काम म्हणजे दारूबंदीची चळवळ

पुर्वास्पृश्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन ब्रिटीश सरकारने त्यांची बॅकवर्ड क्लास बोर्डाच्या सभासदपदी नियुक्ती केली होती.

बहुभाषाकोविद असणाऱ्या सिलम यांनी हिंदी भाषेच्या प्रसारासाठी राष्ट्रभाषा प्रसार समितीचेही कार्य केले.


No comments

Powered by Blogger.