NMMS परीक्षेचा अभ्यासक्रम ( NMMS Syllabus in Marathi )
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)
योजनेची उद्दिष्टे :-
a) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान
विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे.
b) विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.
c) विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा
घडावी.
परीक्षेचे स्वरुप :-
केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली ) २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर घेण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु.१०००/- (वार्षिक रु.१२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.
पात्रता :-
a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी
मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत
असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
c) विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत
जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला
असावा.)
d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत :-
ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगीनवरुन Edit करता येईल. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, याची नोंद घ्यावी.
परीक्षा शुल्क - विद्यार्थ्यांसाठी 120 रु. नियमित शुल्क व शाळेसाठी शाळा संलग्नता फी 200 रु.
परीक्षेसाठी विषय :- सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव,
विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात
b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असते. त्यामध्ये -
१. सामान्य विज्ञान एकूण ( गुण - ३५)
२. समाजशास्त्र (एकूण गुण - ३५)
३. गणित ( एकूण गुण २०) असे तीन विषय असतील.
या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
उपविषयावर गुणांची विभागणी -
a. सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसायनशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
c. गणित २० गुण.
माध्यम :- परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली / अपुरी /अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/ व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
NMMS परीक्षेचा अभ्यासक्रम -
1) बौद्धिक क्षमता चाचणी - MAT
वर्गीकरण
रक्तसंबंध
सांकेतिक भाषा
घड्याळे व कॅलेंडर
दिशा व अंतर
प्रतिमा आणि प्रतिबिंब
क्रम व श्रेणी
2) शालेय क्षमता चाचणी - SAT
सामान्य विज्ञान -
पदार्थांचे गुणधर्म व रचना
उष्णता आणि प्रकाश
विद्युत आणि चुंबकत्व
वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण
पर्यावरणीय समस्या व त्यावरील उपाय
समाजशास्त्र -
भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढा
भारतीय राज्यघटना आणि नागरी हक्क
भूगोल - भारताची भौगोलिक रचना, हवामान, संसाधने
गणित -
पूर्णांक, अपूर्णांक आणि दशांश संख्या
बीजगणितीय संकल्पना
भूमितीय आकृत्या आणि क्षेत्रफळ
प्रायिकता आणि सांख्यिकी
NMMS परीक्षेसाठी साधारणतः अभ्यासक्रम इयत्ता ७ वी आणि ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतो.
Post a Comment