भारताचा अर्थसंकल्प - ऐतिहासिक घटना
भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पापासून 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना -
1.भारताचा पहिला अर्थसंकल्प - स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी 1860 साली सादर केला.
जेम्स विल्सन - यांनी 1853 मध्ये चार्टर्ड बँक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनची स्थापना केली. ज्याचे रुपांतर पुढे 1969 साली स्टँँडर्ड चार्टर्ड बँकेमध्ये झाले.
विल्सन यांनीच The Economist नावाचे प्रतिष्ठित प्रकाशन सुरु केले.
2.स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प - 26 नोव्हेंबर 1947 रोजी तत्कालीन अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी सदर केला.
3.1955 पर्यंत अर्थसंकल्प फक्त इंग्रजीत सादर केला जात होता, परंतु 1955-56 पासून इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रकाशित केला जातो.
4.केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम - माजी प्रधानमंत्री आणि माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
पी. चिंदबरम यांनी आठ वेळा,
यशवंतराव चव्हाण, सीडी देशमुख, प्रणव मुखर्जी - प्रत्येकी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला.
5.1998 पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी सादर केला जायचा.
ब्रिटीशकालीन ही प्रथा मोडीत काढत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी अर्थसंकल्प सादर करण्यास 1998-99 पासून सुरुवात केली.
6.अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री - माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी - 1970 - 71
7.2016 सालापर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे.
2017 पासून तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.
8.रेल्वे अर्थसंकल्प - 2017 पासून रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आला. 92 वर्षांची परंपरा संपुष्टात आली.
रेल्वेचा पहिला अर्थसंकल्प - 1924 साली मांडण्यात आला.
जगजीवन राम यांनी सर्वाधिक सात वेळा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला.
9.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षी ओमिक्रोन प्रकार पाहता 70 वर्षांच्या हलवा समारंभाच्या परंपरेऐवजी मिठाईचे वाटप केले.
पूर्वी बजेटच्या छपाईची सुरुवात हलवा समारंभाने होत असे.
10.2019 मध्ये पारंपारिक लाल रंगाच्या ब्रीफकेस ऐवजी सीतारामन यांनी लाल रंगाच्या लेजर (वही / खतावणी) मध्ये बजेट दस्तऐवज आणले. (राष्ट्रीय चिन्हासह लाल पॅॅॅॅकेट)
11.देशातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे.
1 फेब्रुवारी 2020 रोजी 2 तास 41 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण त्यांनी दिले.
12.देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री - निर्मला सीतारामन
Post a Comment