Header Ads

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांची कारकीर्द - ठळक माहिती

 संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री -

यशवंतराव चव्हाण 


महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री – ३० जून २०२२ पासून -

एकनाथ शिंदे 


मुखमंत्री पदाची टर्म पूर्ण केलेले महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री -

वसंतराव नाईक 


मुखमंत्री पदाची टर्म पूर्ण केलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री -

१.वसंतराव नाईक – तिसरी विधानसभा - १९६७

२.देवेंद्र फडणवीस – तेरावी विधानसभा – २०१४ 


सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री-

१.वसंतराव नाईक – ११ वर्षे ७८ दिवस 


सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री -

वसंतराव नाईक – ५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५ 


सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री -

शरद पवार – ४ वेळा 


महाराष्ट्र राज्याचे हंगामी मुख्यमंत्री पद स्वीकारलेले मुख्यमंत्री -

डॉ.बाळासाहेब सावंत – मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे 


मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पहिले विधान परिषद सदस्य -

वसंतदादा पाटील 


मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले विधान परिषद सदस्य -

१.वसंतदादा पाटील 

२.शंकरराव चव्हाण 

३.पृथ्वीराज चव्हाण 

४.उद्धव ठाकरे 


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री -

एकनाथ शिंदे 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले २० वे व्यक्ती -

एकनाथ शिंदे


सर्वाधिक वेळा कोणत्या पक्षाच्या सदस्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले ? 

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची २३ वेळा शपथ घेण्यात आली.


दोन किंवा अधिक वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे मुख्यमंत्री -

१.शरद पवार – ४ वेळा 

२.वसंतराव नाईक – ३ वेळा 

३.वसंतदादा पाटील – ३ वेळा 

४.शंकरराव चव्हाण – २ वेळा 

५.विलासराव देशमुख – २ वेळा 

६.अशोक चव्हाण – २ वेळा 

७.देवेंद्र फडणवीस – २ वेळा 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पितापुत्र -

शंकरराव चव्हाण 

अशोक चव्हाण 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले काका – पुतणे -

वसंतराव नाईक 

सुधाकरराव नाईक 


मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्वाधिक कमी काळासाठी राहिलेले मुख्यमंत्री -

देवेंद्र फडणवीस 


पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री -

देवेंद्र फडणवीस 


महाराष्ट्र राज्याचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री -

बॅ.ए.आर. अंतुले 


महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री -

शरद पवार – ३८ व्या वर्षी 


महाराष्ट्र राज्याचे सर्वात वयस्कर मुख्यमंत्री -

शंकरराव चव्हाण – ६६ व्या वर्षी – १९८६ ते ८८ 


मुख्यमंत्र्यांना त्यांचा कार्यामुळे मिळालेले वर्णन -

यशवंतराव चव्हाण – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार 

वसंतराव नाईक – हरित क्रांतीचे जनक, शेतकऱ्यांचा जाणता राजा, हरितयोद्धा, आधुनिक कृषिप्रधान भारताचे कृषीसंत, महाराष्ट्रातील पंचायत राज, श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक  

सुधाकरराव नाईक – जल क्रांतीचे जनक 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी निवड झालेले प.महाराष्ट्रातील नेते -

यशवंतराव चव्हाण – सातारा 

वसंतदादा पाटील – सांगली 

शरद पवार – पुणे 

सुशीलकुमार शिंदे – सोलापूर 

पृथ्वीराज चव्हाण – सातारा 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविण्याची सर्वाधिक संधी कोकण विभागाला मिळाली.

डॉ.बाळासाहेब सावंत – रत्नागिरी 

बॅ.ए.आर.अंतुले – रायगड 

बाबासाहेब भोसले - मुंबई

मनोहर जोशी – मुंबई 

नारायण राणे – सिंधुदुर्ग 

उद्धव ठाकरे – मुंबई 

एकनाथ शिंदे – ठाणे 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी निवड झालेले विदर्भातील नेते -

मारोतराव कन्नमवार  - चंद्रपूर 

वसंतराव नाईक – यवतमाळ 

सुधाकरराव नाईक – यवतमाळ 

देवेंद्र फडणवीस – नागपूर 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी निवड झालेले मराठवाड्यातील नेते

शंकरराव चव्हाण – नांदेड 

शिवाजीराव पाटील निलंगेकर – लातूर 

विलासराव देशमुख – लातूर 

अशोक चव्हाण – नांदेड 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी अजून पर्यंत एकाही महिला सदस्याला संधी मिळाली नाही.


-स्पर्धा गुरु 

No comments

Powered by Blogger.