Header Ads

HSC Result 2025 | 12 वी निकाल आज दुपारी 1 वा. जाहीर होणार | महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इ.१२ वीच्या  परीक्षांचे निकाल दि.०५ मे २०२५ रोजी दुपारी ठीक १ वाजता जाहीर होणार.

यंदा  प्रथमच १२ वीचे निकाल लवकर जाहीर होत आहेत. दरवर्षी साधारणतः मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होत असत. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने निकाल लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यंदा १२ वी नंतरच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया ही वेळेतच सुरु होतील. कोविड काळापासून लांबलेली प्रवेश प्रक्रिया व उशिरा सुरु होणारे अभ्यासक्रम यंदा वेळेत सुरु होतील. तसेच १२ वीची पुनर्परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती - 

१. विद्यार्थी परीक्षा क्र.

२. आईचे प्रथम नाव 

12 वी (HSC) निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी हार्दिक शुभेच्छा !!



1 comment:

Powered by Blogger.